" तर मग काय आहे यात ? "
"एक अतीसामान्य जीवनपट ! फार काही सांगण्याजोगं भव्यदिव्य नसताना ही अनाधिकार चेष्टा का ?
असं विचाराल तर, निव्वळ एक मनस्वी आत्मनिवेदन मांडणे - हे असेल माझं या प्रश्नाला उत्तर !
"स्वयं के बारेमे मै केवल इतना जानता हू....की मै कुछ नहीं जानता !" सुकरातचे हे वचन दिशादर्शक ठरलं...आणि वेळोवेळी स्फुरलेल्या चिंतकांचा इथं नकळत डोंगर उभा झाला. वाचताना वेचलेलं...काहीसं तात्विक... जरासं काव्यात्म...थोडसं मनातलं...बरचसं सभोवतालचं असं सारं या गोष्टींच्या शिंक्यात समाविष्ट करत गेलो...एवढंच !
My lafe & times असली वजनी वाहतूक कशापायी? कुछ हटके, कुछ तुफानी, life clippings, गागरमे सागर असं वाचकांना भावतं. हे.निव्वळ शब्द बुडबुडे नाहीत... जाणीव नेणीवेचे पुतळे आहेत. हा सूत्रबद्ध नियमित घटनाक्रम नाही... अनियमित जीवनानुभवांची रोजनिशी आहे. एक ऊर्ध्वगामी भविष्यवेधी चिंतन ज्याची दिशा ही आतापावेतो गाठलेल्या टप्प्यापासून पुढे नेणारी असेल. जगजीवनात "आणखी कायकाय" हे हुडकताना ते मला "आणखी कसंकसं" दिसलं ते सारं या पोतडीत आहे. याहून आणखी नेमकं काय विचाराल तर ते मलाही सांगता यायचं नाही. ते आपणच आपलं ठरवणं बरं नाही का होणार?
"जीवेत शरदः शतं " या वेद-वचनावर निष्ठा राखून सुरु केलेली एक new inning....शरीर-मन स्वस्थ ठेवण्यासाठी हे माझ्या पुरतं - आर्ट ऑफ लिव्हिंग ! सामान्य माणसाला यात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं तरी या खटाटोपाचं सार्थक झालंय, असं मी निर्विवाद समजेन ! आजवर माझं अनुभव-विश्व ...भावविश्व ज्यांनी समृद्ध केलाय त्या तमाम व्यक्त-अव्यक्त संसाधकांना आणि संसाधनांना सविनय अभिवादन ! माझ्या कलमगिरीने जी मने प्रभावित झाली...त्या समस्त अनाम वाचकांना ही साहित्यकृती समर्पित !!
मी एक तत्वज्ञ
समजायला लागल्यापासून.... नंतर अक्षरओळख झाल्यापासून माझी प्रत्येक कृती ही तात्विक पातळीवरून होत गेल्याचे जाणवते. याअर्थी मी स्वयंघोषित तत्वज्ञ आहे..... आणि यामुळे कुणाला काही त्रास त्रास नसल्यानं , अन्य काही आक्षेप, उजर असण्याचं कारण नाही.
चांदोबाचे मंतरलेले दिवस
सातत्याने सकारात्मक विचारांच्या योगदानासाठी गीताप्रेस गोरखपूर या प्रकाशन संस्थेची प्रतिष्ठित गांधी शांतता पुरस्कारासाठी झालेली निवड ही न्याय्य आहे. या अनुषंगाने ६ जुलै च्या मागोवा पुरवणीत प्रकाशित लेख दिशादर्शक आहे. सहज प्रश्न उद्भवला की धर्मध्वजा अथकपणे फडकवणाऱ्या गीताप्रेस गोरखपूर या प्रकाशन संस्थेची नव्या पिढीला किती माहिती असेल ?
शंभर वर्षाची ही संस्था सातत्याने हिंदू धर्म ग्रंथांचे प्रकाशन करीत आहे. हा समस्त हिंदूंसाठी अभिमानाचा विषय आहे. खूप जुनी धार्मिक पुस्तके बघता त्यात दोन नावे हमखास असायची. केशव भिकाजी ढवळे आणि दुसरे गीताप्रेस गोरखपूर. चित्रकरांनी काढलेले धार्मिक व्यक्तिरेखांची चित्रं सुद्धा गीताप्रेस प्रकाशित करीत असे तेही चित्रावर किंवा खाली सुंदर ओळी लिहून ! कोणत्याही मंदिरातीलपुस्तक विक्रीच्या ठिकाणी गीताप्रेसची पुस्तके अगदी लहान पुस्तिका ते जाडजूड ग्रंथराज या स्वरूपात बघितल्याचे अनेकां ज्येष्ठांच्या स्मरणात असेल. अजूनही सदर पुस्तकांचे नव्या स्वरूपातील पुनर्मुद्रण उपलब्ध आहे.
दणकट कापडी वेष्टन यामुळे गीताप्रेसचे ग्रंथराज दुरूनच ओळखू येत. मोठ्या ग्रंथाची मजबूत कापडी बांधणी बघून तेथे पुस्तक बांधणी विभाग किती मोठा असेल याची कल्पना येते. पुस्तकावर एक तळटीप दिसायची. यह कागज भारत सरकारसे रीयायाती दर से प्राप्त हुवा है असे आवर्जून नमूद केलेले असायचे.पूर्वी गीताप्रेसची हिंदी ही प्रमुख भाषा असली तरी कालांतराने पुस्तके विविध भाषेत येताना दिसू लागली.गीता, रामायण याखेरीज काही मान्यवर स्थानिक संतांचे साहित्यही गीताप्रेस प्रकाशित करू लागली. या संदर्भात गीताप्रेस प्रकाशित दासबोधाचा उल्लेख करावासा वाटतो. सदर पुस्तके आधुनिक तंत्राचा वापर करताना गीताप्रेसच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती दिवसागणिक वर्धिष्णू होताना आढळून येते. यावरून वेळोवेळी येथे नियोजनबद्ध आधुनिकीकरण होत आल्याचे स्पष्ट होते.
गीताप्रेस गोरखपूर हे फारच भारदस्त नाव. येथून कल्याण नामक मासिक प्रकाशित होत असून ते घरी येणे हा अभिमानाचा विषय होता. त्यात मान्यवरांची हजेरी लेखनात असायची. तसेच अनेक ठिकाणी त्यातील माहिती ही अधिकृत शास्त्रसंमत संदर्भ गणली जात असे.कल्याण मासिकाचे अंक तत्कालीन अनेक व्यासंगी लोकांनी निष्ठेने क्रमवार जतन केले होते.
गीताप्रेसची सर्वात उल्लेखनीय विशेषता अशी की येथील मुद्रित-शोधन प्रक्रिया अतिशय बारकाईने केल्या जात असे. परिणामी संपूर्ण ग्रंथात अजिबात चूक शोधूनही सापडत नसे. हे परमार्थ कार्य समजून तळमळीने केले जात असावे. प्रामाणिक कटीबद्धतेखेरीज हे कसे शक्य आहे ?
गीताप्रेसच्या ग्रंथांचे लेखक अनेक असले तरी प्रामुख्याने श्री जयदयालजी गोएंदका, श्री स्वामी रामसुखदास, हनुमानप्रसाद पोद्दार ही नवे अग्रस्थानी होती.. हे सर्व तपस्वी वृत्तीचे असून महान भक्त असल्याचे त्यांची एकूण तळमळ बघून जाणवते. त्यांची छायाचित्रे कुठेही नसत इतके ते प्रसिद्धी पराग्मुख होते. ते नेमके दिसायला कसे असावेत हे कुतूहल शेवटपर्यंत शमले नाही. इतकी पुरातन संस्था डबघाईस आल्याचे वृत्त दरम्यानच्या काळात ऐकून सश्रद्ध लोकांच्या काळजाचे पाणी झाले होते. पण या वृत्तात काही तथ्य नसल्याचे वाचून जीव भांड्यात पडला.
मोठ्या शहरात गीताप्रेस्ची दुकाने असली तरी लहान गावातही अनेक धार्मिक व्यापारी आपल्या दुकानात एका बाजूला गीताप्रेस्चे साहित्य विक्रीस ठेवण्याचे धर्मकार्य करीत असत. अशाच एका ठिकाणी मी एकदा पुस्तक विकत घेण्यासठी गेलो. पुस्तक थोडे मोडले असल्याने मी दुसरी प्रत मागितली. तेव्हा ते सज्जन व्यापारी म्हणाले.
“महाशय, पुस्तकांची वाहतूक होताना धक्का लागून असं होऊ शकते…वाचताना काही त्रास होणर नाही…आणि हे पुस्तकही लोकांपर्यंत पोह्चावयास हवे…आणि आपल्या सारख्या भाविका खेरीज अन्य कोण ही पुस्तके विकत घ्यायला येणार ? आपण नाही घेतले तर हे पुस्तक तुमच्या सारख्याच एखाद्या अन्य भाविकाला विकावे लागणार ? ते तुम्हाला चालेल काय ?” त्यांच्या या प्रश्नाने विचार विवश करून सोडले आणि मी नवीन प्रतीचा आग्रह सोडून तेच पुस्तक विकत घेतले.असो.
हरेक पुस्तकाच्या मलपृष्ठावर गीताप्रेसच्या अन्य पुस्तकांची यादी असे. याखेरीज संपूर्ण विस्तृत यादी मिळावी या हेतूने मी गीताप्रेसला पोस्ट-कार्ड टाकलं. लगेच उलट टपाली मला पुस्तकांची छापील समग्र-सूची पाठविण्यात आली. सोबत एक पत्र होतं. त्या पत्राची सुरुवात होती. सादर हरी-स्मरण ! आणि शेवटचे शब्द होते - शेष हरीनाम ! पत्राला उत्तर देणारे ते महानुभाव आताच्या काळात निव्वळ कल्पनातीत आहेत.
गीताप्रेस गोरखपूर हा समस्त भारतीयांचा एक सांस्कृतिक ठेवा आहे. एक दैदिप्यमान वारसा आहे. भलेही एकवेळ ताज-महाल बघायचे राहून गेले तरी चालेल…पण गीताप्रेसची अवश्य भेट घ्यायला हवी !
सुविचारांचा सांगाती
मानसिक जडणघडण आईकडून
वारसाहक्काने मिळाली. सतत या णा त्या चिंतेच्या पारंबीला झुलत राहण्याचे प्राक्तन
! कालांतराने त्या चिंतांचे फोलपण ध्यानात येऊन हसू येई, त्याप्सून धडा घेत नव्या
चिंतेपासून सोडवणूक करणे जमत नसे. विवेकीपानाने ही घालमेल लपवू शकत असे हे बरे !
सुविचार, स्फूर्तीदायी सुभाषिते यांची या काळात खूपच मदत झाली. धैर्य हा सर्वात
मोठे सद्गुण असून तो नसेल तर बाकी सारे गुण व्यर्थ आहेत. मानसोपचार पुस्तकांतून व
इतर थोरांच्या वचनातून स्फुतीदायी विचार मिळाले आलं. धैर्य वाढविणारे सुविचार मी
वहीत मांडत गेलो. बघता बघता एक पुस्तक तयार होईल इतकी वही भरली आहे. सकारात्मक बाजू निवडत पुढे जावे...मग ते तुम्हाला कुठेही घेऊन जावो...त्याने भलेच होणार...हा सुविचार प्रबळ ठरला.
पिस-वर्कची शक्ती
संकल्प पेक्षाही सातत्य महान आहे. दशरथ माझी या झारखंड येथील अवलियाने एकहाती पहाड तोडून रस्ता बनवला तो निव्वळ सातत्याने ! कडाडणाऱ्या विजेच्या क्षणिक लोळापेक्षा देवघरातील स्थिर नंदादीप महत्वाचा. वाघाची शक्ती नसली तरी कासवाची गती हवी. कामाच्या पूर्ततेसाठी शक्तीपेक्षा सातत्याची अधिक गरज असते. पीस-वर्क या माध्यमातून सातत्य सहज प्रभावीपणे राबविले जावू शकते असा माझा आजवरचा अनुभव आहे.
काही जगड्व्याळ कामाचे स्वरूप निव्वळ भयावह असते. पण क्रमाने, दररोज निश्चित वेळी अमुक वेळेत थोडाथोडा कार्यभार उरकला तर लवकरच भल्या मोठ्या कामालाही एक शेप म्हणजे आकार येतो. नंतर पुर्तातेकडे वेगाने वाटचाल करता येते. Any work...if you want to do it....it will be complited....whereas if you dont want...it will be pending...forever !
मोठे कठीण-कडक फर्निचर उधळी सातत्याने अल्पावधीत पार पोखरून टाकते. एखादी मोठी कंपनी मोठे उद्दिष्ट टार्गेट पूर्ण करते ती सर्वांच्या वर्षभराच्या निरंतर पीस-वर्क मुळेच ! patience & persiverance हे दोन पीस-वर्क चे आधारस्तंभ आहेत. पिस-वर्क मध्ये थकव्याला जागा नाही... तणावाला वाव नाही...परिणामी चुका होण्याची शक्यता नगण्य ! पण कामाच्या यशस्वी पूर्ततेची हमी आहे. पीस-वर्क चे सूत्र आहे......थेंबे थेंबे तळे साचे - हळू हळू काम सरे !!
कथा-लिखाण, साहित्यापासारा ऑनलाईन करणे, कचरा साफ करणे, कंपाईलिंग, गृपिंग करणे या काबूत आणण्यासाठी पीस-वर्कची खूपच मदत झाली. पुस्तके अनेक आहेत पण वाचणार कधी? विषय तर अनेक आहेत पण लिहिणार कधी? मुहूर्तच लागत नाही....नित्य-वाचन...नित्य-लेखन हा पीस-वर्कचाच एक प्रकार आहे.
दिवस देवाचा - रात्र राक्षसाची
कलावंताच सर्वतोपरी जगला
जीविका उप-जीविका
कलावंत आणि व्यक्तित्व कलावंत सर्वश्रेष्ठ कारण तो तंद्री अनुभवतो शेवटी एक डॉक्टर काय कामावतो आयुष्यभर
याअर्थी कलाकार सर्वतोपरी जगतो (आवडीच्या कामाचा आनंद, पैसा, कीर्ती)
कायद्याचा फायदा काय?
न कळत्या वयात कायदा हा शब्द कानी पडला....
कायद्याने मिळायला हवे...कायदा तर हवा ! कायदा नाही तर काय करणार?
कायदा वायदा मला माहीत नाही !
"असं नाही चालायचं...ignorance of law have no excuse .... असे संवाद ऐकून बालमनाला सर्वप्रथम प्रश्न पडला की.... कायदा म्हणजे काय ? कायद्याचा फायदा काय? नंतरही वकील, खटला, कोर्ट, कायदा हे शब्द कानावर आदळत राहिले !
कायदा म्हणजे काय हो? कायद्याचा अभ्यास केलाय म्हणजे काय?
मी नंतर LL B केलं ते professhanal आणि एडीशनल qualification असावे म्हणून प्रक्टिस साठी नव्हे. ... परीक्षेच्या प्रक्टिकल साठी केसेस गोळा करायला जाताना न्यायालयातील एकूणच वातावरण बघून उबग आला.
न्याय शब्दाचा एक वेगळा अर्थ कळला. जो तो आपली औपचारिकता पुरी करत आपापल्या चाकोरीतून काम पुढे ढकलीत असतात. ऑन रेकॉर्ड आणि ऑफ रेकॉर्ड असे वेगळे व्यवहार सुरु असतात. ऑफ रेकॉर्ड सेटल झालं तर ठीक नाही तर नैलाआजाने ओंन रेकॉर्ड करावे लागते.यात कायद्याचा संबंध प्रारंभी कुठेच नसतो. असलाच तर आपण त्यात अडकू नाय्ये ही बंधने जोतो बघत असत. प्रश्न हा की कायद्याची गरज कुठे पडते?
शेवटी कागदपत्रे फायनल करताना ती कायद्याच्या कलमानुसार करण्यात येतात. तेथे कायद्याचा संदर्भ नमूद करण्यासाठी पुस्तके हुडकण्यात येतात. काग्दाबाहेरचे जे व्यवहार होतात तेथे कायदा काहीच करू शकत नाही. आपापली आसक्ती अनेकांना तेथे बांधून ठेवत असते. त्यामुळे व्यवहार टाळणे शक्य नसते. अशा या वातावरणात जीवन-रम्य असं काहीच आढळलं नाही.
आत लिखित कायदे theoratically काटेकोर असतात पण बाहेर practically वेगळीच प्रॅक्टिस सुरु दिसते तर मग लिखित कायदे हवेत कशाला? नंतर कागदपत्रे documents करताना पुस्तकातील कलमे योग्य जागी टाकण्यासाठी
पत्र शस्त्र
sample letters
श्रद्धांजली अभिनंदन जिल्हाधिकारी वगैरे
मेघदूत कार्ड ची गोष्ट पोस्टेज खरेदी हास्यास्पद पण स्मृती सुगंध जपला तो पत्रानीच
निनावी पत्राने मत कळवणे जे फोन ने साध्य होत नाही
कबुतर ते इ-
अब्जीनंदन खुशिपत्र प्रतिक्रिया आभार तोंडी न देता ते लिहून दिले तर कायम होतात माणूस ते पत्र जपून ठेवतो
sample letters
श्रद्धांजली अभिनंदन जिल्हाधिकारी वगैरे
मेघदूत कार्ड ची गोष्ट पोस्टेज खरेदी हास्यास्पद पण स्मृती सुगंध जपला तो पत्रानीच
निनावी पत्राने मत कळवणे जे फोन ने साध्य होत नाही
टीटी शी अतूट नातं
लहानपणापासून टाईम-टेबलशी माझं अतूट नातं राहिलं आहे. त्यातून पुढे आचार-संहितेकडे वळलो. वेळापत्रकात खंड पडला की ते कोलमडते हा अनुभव आल्यानं टीटी शी बांधिलकी अधिकच दृढ झाली.
लहानपणी काटेकोरपणा वेळेचे नियोजन, कामाची यादी इ. सवयी अंगभूत होत्या. पाठांतर उत्तम. भाषेशी जवळीक आणि पर्यायानं गणित शत्रू हे ओघानं आलंच...विज्ञानाचं महत्व होतं पण अभ्यास कठीण वाटे..उदा रसायनशास्त्र इक्वेशन बलान्सिंग वगैरे जमत नव्हते....असो आपण भाषा साहित्याची आवड उत्तरोत्तर वाढत गेली. कारण ती उपजत होती.
हळूहळू time table चा उबग आला. परमार्थ पुस्तके वाचून मनात विचार बदलला...वाटलं कशाला हवाय हा उपद्व्याप? जन्माला आलो तेव्हाच तर भविष्याचे वेळापत्रक म्हणजे प्रारब्ध तयार आहे की !
इतका मोठा हिशेबनीस ...time keeper वर बसलाय मग मी का पैपै चा हिशेब मांडायचा? .त्या देवानेच वेळापत्रक देवून पाठवले आहे..आपुन क्यू उसका कानून हाथ मे लेना? मग मी पुन्हा वेळ का दवडावा?
या विचारानं मी वेलाआप्त्राकातून तात्पुरता मुक्त झालो तरी...हरेक नव्या मोहिमेची सुरुवात टीटी ने होत असे...असं हे साहचर्य फार विलाक्षण आहे. कधी वाटते..... शेवटच्या दिवशी सुद्धा कदाचित टाईम टेबल पाठ सोडेल की नाही?
कलावंतच सर्वतोपरी जगतो
जीविका उप-जीविका
कलावंत आणि व्यक्तित्व कलावंत सर्वश्रेष्ठ कारण तो तंद्री अनुभवतो शेवटी एक डॉक्टर काय कामावतो आयुष्यभर
याअर्थी कलाकार सर्वतोपरी जगतो (आवडीच्या कामाचा आनंद, पैसा, कीर्ती)
धम्माल ऑटोरिक्षा !
आमचे एक मित्र श्री राम किन्हीकर स्वतःला बसफॅन म्हणवतात…. तसा मी ऑटोफॅन आहे !
हल्ली बहुतेकांकडे कार असतेच…. किती तिची वास्तपुस्त ….त्यात सुविधा अधिक... हे सारं मान्य केल्यावरही आटोचं एक वेगळं आकर्षण उरतंच !
हवी तेव्हा बोट करून थांबवता येणारी ही एक मस्त चीज... नेहमीच सर्वत्र कार सोबत नेता येत नाही... बस सुद्धा हरेक ठिकाणी वळू शकत नाही… टॅक्सी सुद्धा चटकन गल्लीत उपस्थित होऊ शकत नाही ... ओला उबर साठीही मोबाईल क्रिया ही करावीच लागते…त्याच्या आधीच्या काळापासून... हरेक गल्लीत कोपऱ्यावर उभा ऑटोवाला नेहमीच आकर्षित करीत आला आहे.
कुठे जाणार? किती पैसे? या दोनच प्रश्नाच्या उत्तरात क्षणार्धात ऑटो'चा मनोरम प्रवास सुरू होतो. हे खरं की खोटं? ऑटोवाला आपल्याकडे पाठ करून ग्राहकाला जे स्वातंत्र्य बहाल करतो ते कारमध्ये शेजारी बसून मिळत नसते !
गंतव्य स्थानी उतरताच भाडं घेऊन ऑटोवाला दिसेनासा होतो…. काही देणी घेणी मागे उरत नाहीत निव्वळ भाड्या पुरता तात्पुरता व्यवहार…. हा एक निष्काम कर्मयोगच !
छान नवाकोरा ॲटो... तरूण-आनंदी ऑटोवाला असावा आणि गावाच्या गाव मी मजेत सफर करावी असं बरेचदा वाटून जातं ! हे स्वप्न कधी पूर्ण होईल? काळी साडी पिवळा ब्लाउज - भटकायची तर खूपच हौस ! हे कोडं लहानपणी घालत असू…. पण अजूनही त्यातील ताजेपण ओसरलं नाहीये !
सोनेरी उन्हाचा चाहता
हिरव्याकंच पानांतून स्त्रवणारी ती सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरीप मला खूपच भावते. निसर्गाचे ते अवखळ उत्फुल्ल शोडशी चैतन्य ! निसर्गाचं ते शोडशी चैतन्य...आसमंतात तो पिवळाधम्म सहस्त्ररश्मी सूर्य दिसायला हवा. मध्यान्ही तो पिवळाधम्म रविराज आगीचे लोळ ओकतो.. तेव्हा अंग शेकायला होतं...नवी झळाळी नवे तेज प्राप्त होतं..अर्थात .जुलै मधील तो उकाडा असह्य.... पण ढगाळ वातावरणात जेव्हा सूर्यदर्शन दुरापास्त होतं तेव्हा भकास आणि भयाण हे दोनच शब्द पिंगा घालू लागतात....जीव कासावीस होतो.... चैतन्य कुंठीत होतं.... छातीवर अनामिक दाब आणि दडपण येतं. अल्पावधीत ढगांना दूर सारून सूर्य डोकावला की क्षणात नैराश्य मावळते. शुध्द हवा, निरभ्र आकाश आणि सोनेरी सूर्यप्रकाश असेल तर माझ्या जीवाची बॅटरी चांगली चार्ज होते. जी कुंद हवा आणि ढगाळ वातावरणात पार डाऊन झालेली असते.
माझा जन्म ऑक्टोबर म्हणजे थंडीतला...पण थंडी मला भिवविते...सहन होत नाही..जणु रक्तवाहिन्यांना एक जडत्व येतं. लहानपणी थंडीच्या दिवसात अर्धशिशी ही पाचवीला पुजलेली असायची. सारं कसं शांत, निवांत ठरवून आणि राजेशाही थाटाने हवे...पण दैवानेही साथ द्यायला हवी !
उन्हाळा भावतो कारण तो मला मानवतो...उन्हाळा म्हणजे सन-शाईन डेज...वातावरण रम्य आणि रमणीय वाटते...समस्या त्या मानाने कमी होतात...कानाला गमछा आणि प्यायला वाळ्याचे गार पाणी मिळाले की बेतास बात...वरून लिंबू-सरबत, पन्हे, उसाचा रस..अहाहा..बाकी उन्हाळ्याची तक्रार म्हणून कशाला? एवढी माफक गरज भागली तरी पुरे !
उन्हाळ्यात दिवसाचा मोठा हिस्सा वाट्याला येतो ही जमेची बाजू..लवकर उजाडूनही तिन्हीसांज उशिरा होते....भसाभसा जेवण जाते...ढसाढसा पाण्याचे घोट पोटात जातात..हातपाय सटासट हलतात...सपाटून झोप लागते...याउलट शरदऋतुत जणु रक्तच गोठते...सर्दी पडशाचे ट्राफिक जाम ...मनावर मणाचे दडपण !चोरीच्या बातम्या वगळता बाकी उन्हाळ्यात सामुहिक सहली छान पार पडतात...रस्त्याची प्रलंबित कामे निघतात...
कृश शरीरयष्टी...चिंतनशील तत्वज्ञानी...विरक्त वैरागी, कलंदर छांदिष्ट असे लोक उदा.डायोजेनिस यांनाही थंडीचा त्रास होता म्हणे...म्हणून ते सोनेरी उन्हाचे चाहते होते का? यामागचे आयुर्वेद आणि विज्ञान शोधायला हवे ! कडक उन्ह ज्यांना सुखद वाटते ते तत्वज्ञांनी वृत्तीचे, छांदिष्ट, चिकित्सक, सृजनशील लेखक, कवी का असतात? त्यांचे केमिकल्स त्यांच्या बुद्धीची जादान्घादन तशी करतात का...कारण एक समान वैशिष्ट आढळते ते म्हणजे थंडीचा त्रास असणे आणि पर्यायाने सोनेरी उन्हाचे चाहते असणे !! Really sun is a great mood booster.
शांती की खोज मे
आनंद शांतीच्या शोधात मी मोकळ्या माळरानावर जाऊन बसतो....तेथे पंचतत्त्व विपुल असते...जमीन...जमिनीखाली पाणी, वरून सूर्याचं तेज, चोहीकडे वाहणारा वायू, आणि सभोवताल व्यापून असलेली पोकळी म्हणजे आकाश ! जमिनीवर झोपल्याने पृथ्वीतत्व शरीरातील सर्व रोगराई खेचून घेते. असा माझा विश्वास आहे. त्या धरित्री मायच्या मांडीवर जो विश्राम मिळतो तो अन्य कोठे मिळणार?
येस्स यू मे कॉल मी सुपरस्टीशीअस
मी अंधश्रद्धावादी कधी झालो म्हणाल तर जन्मापासून..म्हणाल तर न कळत्या वयापासून...कारण घरी त्याखेरीज अन्य वातावरण नव्हतेच मुळी !
माझ्या बुधीवादाच्या प्रवासाचे अडथळे विलक्षण होते. प्राथमिक जडण-घडण धार्मिक होती. सामाजिक आर्थिक शारीरिक मानसिक आधार तुटपुंजा असला की आधार केवळ देवाचा असतो...संकटात तोच तरुण नेणार त्यावर सारी भिस्त असते. देवाशी संधान यासाठी अन्य कुणाची गरज नसल्यानं ते सोपं असते. त्यात कर्म-सिद्धांताने मनावर विलक्षण गारूड केलं होतं.
मी बुद्धिवादी कसा झालो ?
माणूस वयात येतो तेव्हा जुन्या रूढी मोडून जग बदलण्याच्या बाता करतो. हेच तारुण्याचे दृश्य लक्षण असते. बर्या दिवसात माणूस छातीला मातीच्या गोष्टी हाणतो. लाथ मारून पाणी काढण्याच्या दिवसात बुद्धीवाद, वास्तववाद, प्रत्याक्षवाद, विज्ञानवाद जवळचा आणि आश्वासक वाटू लागतो.
पुस्तकांचा परिणाम ही उल्लेखनीय बाब होय. विज्ञानवाद, आस्तिक नास्तिक, आत्मा, पुनर्जन्म या चक्रात अडकलेलं अध्यात्म थोतांड वाटू लागलं. विज्ञान सोडून बाकी सब झूट वाटू लागलं. आदमी पिछले जनम का क्रम नही तो इस जनम की परिस्थितीया भोगता है....या विचारांनी प्रभावित होण्याचे ते दिवस होते.
आजवर मनात जोपासलेले विचार जेव्हा खुळे वाटू लागतात ती तगमग अनाकलनीय असते. त्यामुळे नित्यनैमित्तिक स्त्रोत्रांचा विसर पडला. रोज अंघोळीची गरज भासेनाशी झाली. देवळात जाणे कालापव्यय वाटू लागला. गीताप्रेसची अनेक संग्राह्य पुस्तके वाचनालयाला देऊन टाकली, टिळा विभूती लावणे कमी झाले.
मी पुन्हा परमार्थाची कास कशी धरली
संकटाच्या वेळी जेव्हा मानवी मर्यादा अडवतात, प्रयत्न निष्फळ ठरतात तेव्हा मानसिक आधार केवळ सर्व-व्यापक, सर्व-शक्तिमान, सर्वान्तर्यामी परमेश्वर देऊ शकतो...याचं साक्षात्कार झाला. हाक मारली तर धावून येणारे किती? याचा आढावा घेतला तेव्हा स्वतःच्या सामर्थ्याचा फोलपणा ध्यानात आला.
आणि मी गर्वांनी म्हणू लागलो...होय तुम्ही मला खुशाल अंधश्रद्ध म्हणा....मला त्याचा अभिमानाच वाटेल. देवा हात जोडतो..खाण्या-पिण्याचे देहदमन जमायचं नाही रे बाबा....यासाठी लावायचे ते पाप माझ्या माथी लावून मोकळा हो कसा.... अरे, जे अभक्ष्य भक्षण करतात...त्याना पापाची पर्वा नसते...भीती नसते...तर मग मला कशाला आणखी नियम हवेत?
होय, आता तुम्ही मला खुशाल अंधश्रद्ध म्हणा...मला त्याचा अभिमानाच वाटेल.
अतीसाहीष्णू हे अतिरेकीच
शस्त्रसज्ज शत्रूला शांतीपाठ ऐकवणारे अतीसाहीष्णू हे अतिरेकीच !
HSP (health safety & personality )
look decent act decent speak decent
जगावेगळे छंद : battery charging पंचतत्वात माळरानावर पहुडणे , मजल-दरमजल गावदर्शन सदिच्छा भेट
आटोपशीर बोचकी
बीजपेरणी सुरु ठेवावी
माझं कुतूहल
माझे बारके शोध
माझी खाद्ययात्रा
माझा पत्रव्यवहार
एकांत माझं सांगाती
माझं कुतूहल, पेहेराव, व्याधी आणि खाऊगिरी
सोनेरी उन्हाचा चाहता
४८ आणि ७२ तासांचा दिवस
इस तबियत ने निकम्मा कर दिया- वारणा बाम भी आदमी थे काम के
ज्योतिष संभ्रम आणि समाधान ---ज्योतिषाचा नाद
बालपणापासून वाचनाची पाजत गोडी...यथाकाल सर्वच थरातील विस्तृत वाचन घडत गेलं. तेराव्या वर्षापासून सुरु झालेली कलमगिरी पुढे सातत्यानं टिकून राहिली...विविध निबंधस्पर्धा, वाचनालये आणि साहित्य प्रसार केंद्राच्या वाचानस्पर्धा यात आवर्जून सहभाग नोंदवीत असे.
कालयात्रा हा कथासंग्रह प्रकाशित...यात अखंड काळाच्या विलक्षण किमयेतून उलगडणारा मनुष्यस्वभाव ..पर्यायाने विविध जीवनरंगआणि जीवनमूल्ये यांचे मनोज्ञ चित्रण साकारण्याचा प्रयत्न केलाय ! मानवी स्वभावाची गुंतागुंत हाच या लघुकथांचा केंद्रबिंदू !! कालानुरूप बदलती जीवनमूल्ये प्रसंगी तत्त्वनिष्ठा तर कधी व्यक्तीनिष्ठा तसेच प्रसंगनिष्ठेच्या निकषावर घासून व्यक्त झालेले हे अभिजात सृजन लोकाभिमुख करण्याचा एक प्रयास ! याच अनुषंगाने काळ हा धागा पकडून आकारलेल्या कथांचा संग्रह म्हणजे कालयात्रा....या सर्वच कथा कल्पित, स्वरचित आणि स्वतंत्र आहेत.
चंद्रपूर सारख्या काहीशा मागास क्षेत्रात जेथे कोळसा आणि सिमेंटचे वितरण होते. तेथे पुस्तकांच्या वितरण व्यवस्थेचा अभाव आहे. अशा ठिकाणी लेखन अक्षर-जुळवणी, मुद्रित-शोधन , मुद्रण इत्यादी प्रक्रिया पार पाडणे हे एक मोठं कष्टप्रद आव्हान होतं.
शिक्षण एम.कॉम. एल एल.बी.. लॉ च्या अंतिम वर्षात
आपणास लहानपणी प्राप्त 'निराधार माहिती', ही 'ज्ञान' प्राप्तीमधील फार मोठी अडचन असून ही प्राप्त माहिती 'जिज्ञासे'ची शत्रु आहे!
एक सन्दुक पिढ्यांनी जपावी
